Thursday, May 22, 2025

विधानपरिषद शिक्षक मतदारसंघ निवडणूक…. नगर जिल्ह्यात आचारसंहिता लांबणार…

नगर : निवडणूक आयोगाने विधान परिषदेच्या नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी दरवेळेस नव्याने मतदान नोंदणी होते. त्यानुसार ३० डिसेंबरपर्यंत जिल्ह्यात १४ हजार ६४२ शिक्षक मतदारांची नोंदणी करण्यात आली आहे. निवडणूक १० जूनला तर १३ जूनला मतमोजणी होईल.

निवडणुकीचे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी ही माहिती दिली. दरम्यान सध्या लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जारी आहे. ही आचारसंहिता ६ जूनपर्यंत लागू राहील. शिक्षक मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाल्याने या मतदार संघाचीही आचारसंहिता जारी झाली आहे. या शिक्षक मतदारसंघाची आचारसंहिता १८ जूनपर्यंत लागू राहील. त्यामुळे जिल्ह्यात आचारसंहिता लांबली गेली आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles