राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. राज्यात कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटच्या रुग्णांचे निदान होऊ लागल्याने नागरिकांची चिंता वाढली आहे. कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागल्याने टास्क फोर्सने आज महत्वाची बैठक बोलावली. या बैठकीत कोरोनाला रोखण्यासाठी टास्क फोर्सकडून महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.
राज्यातील वाढत्या कोरोना रुग्णाच्या पार्श्वभूमीवर टास्क फोर्सने बैठक आयोजित केली. या बैठकीत कोरोनाच्या नव्या व्हेरिएंट आणि त्याचे संसर्ग रोखण्यावर बैठक झाली. तसेच या बैठकीत कोरोनाला रोखण्यासाठी १५ दिवस महत्वाचे आहेत, हे अधोरेखीत करण्यात आलं.
या बैठकीत कोरोना संसर्ग रोखण्यासाठी घेण्याची काळजी, ILI/SARI रुग्णांची तपासणी, क्लिनिकल प्रोटोकल तयार करणे, अफवांना अटकाव करणे या बाबींवर चर्चा करण्यात आली.
देशासहित राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागल्याने नागरिकांच्या चिंतेत भर पडली आहे. राज्यात गेल्या २४ तासांत १४६ नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर आज कोरोना जेएन. १ चा एकही रुग्ण आढळला नाही. त्यामुळे राज्यात जेएन.१ कोरोनाचे ११० सक्रिय रुग्ण आहेत.