जून २०२२ मध्ये महाविकास आघाडीचं सरकार पडलं. त्यानंतर जुलै महिन्यात झालेल्या मुलाखतीत अमृता फडणवीस म्हणाल्या होत्या, “देवेंद्र हुडी घालून आणि मोठा चष्मा लावून बाहेर पडत असत. मला सुद्धा ते ओळखायला यायचे नाहीत. मी त्यांना विचारलं की हे काय चाललं आहे? ते म्हणायचे काही नाही. पण मला तेव्हा वाटायचं की काहीतरी सुरु आहे.” असं अमृता फडणवीस एका मुलाखतीत म्हणाल्या होत्या. त्यावरच आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकमतच्या कार्यक्रमात मिश्किल भाष्य केलं आहे.
अमृताने जे सांगितलं आहे ते खोटं आहे कसं काय म्हणणार? राजकीय बाबतीत माझी एक इच्छा असते अर्थात माझी तेवढी हिंमत नाही माझी पण त्यांच्या तोंडाला चिकटपट्टी लावली तर बरं होईल, कारण असे असे सिक्रेट त्यांनी सांगितलेत ते काय करायचं? पण तो काळ आता गेला आता काही चमत्कार करण्याची आवश्यकता नाही.” असं उत्तर देवेंद्र फडणवीस यांनी देताच मोठा हशा पिकला.