Saturday, October 5, 2024

कोण म्हणतो कारसेवेला गेलो नाही?…देर्वेंद्र फडणवीस यांनी फोटोचा पुरावाच दिला…

बाबरी मशिदीच्या पतनावेळी आपण अयोध्येत कार सेवेसाठी गेलो होतो, असा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अनेकदा करत असतात. मात्र, विरोधकांकडून त्यांच्या या दाव्याची वेळोवेळी खिल्ली उडवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी सोशल मीडियावर एक फोटो ट्विट करुन आपण बाबरी पतनावेळी अयोध्येला गेल्याचा पुरावा सादर केला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक ब्लॅक अँड व्हाईट फोटो शेअर केला आहे. या फोटोत अयोध्येला जाण्यासाठी निघालेल्या कारसेवकांच्या जथ्थ्यात उभे असलेले देवेंद्र फडणवीस उभे असल्याचे दिसत आहे. हा फोटो नागपूर रेल्वे स्थानकावरील असल्याचे फडणवीसांनी म्हटले आहे.

या फोटोसोबत लिहलेल्या कॅप्शनमध्ये फडणवीसांनी म्हटले आहे की, ‘जुनी आठवण…नागपूरहून प्रकाशित होणार्‍या ‘दै. नवभारत’ने मला हे छायाचित्र आवर्जून पाठविले. अयोध्येला जाणार्‍या कारसेवकांची नागपूर रेल्वे स्थानकावर गर्दी उसळली, तेव्हाचे हे छायाचित्र. छायाचित्रकार शंकर महाकाळकर यांनी ते टिपले आहे. उद्या (22 जानेवारी) अयोध्येत प्रभूश्रीरामचंद्रांची प्राणप्रतिष्ठा होत असताना या छायाचित्राच्या माध्यमातून जुन्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा मिळाला आहे… नवभारत परिवाराचा मी अतिशय आभारी आहे’, असे फडणवीसांनी म्हटले आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles