गेल्या आठवड्यात आमदार गणपत गायकवाड यांनी पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार केला होता. हे प्रकरण शांत होते ना होते तोच शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गुरुवारी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. यावरुन विरोधकांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल केला. संजय राऊत, सुप्रिया सुळे यांच्यासह विरोधकांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली. यावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट शब्दात प्रतिक्रिया दिली आहे. गाडीखाली कुत्रं आलं तरी विरोधक राजीनामा मागतील, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना लगावला आहे. अभिषेक घोसाळकर यांच्यावर गुरुवारी गोळीबार झाला. ही घटना अतिशय दुःखद आहे. एका तरुण नेत्याचे असे निधन होणे गंभीर आहे. ज्यांनी गोळ्या घातल्या ते मॉरिस आणि अभिषेक घोसाळकर एकत्र होते. पण त्यांचा नेमका काय वाद झाला आणि असे कृत्य का घडलं? याची पोलीस चौकशी करत आहेत, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
देवेंद्र फडणवीस म्हणतात..गाडीखाली कुत्रं आलं तरी विरोधक राजीनामा मागतील…
- Advertisement -