शासनाच्या शालेय शिक्षण विभागाच्या खात्यातून तब्बल 47 लाख 60 हजार चोरीला गेल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. आरोपींनी शालेय शिक्षण विभागाचे बनावट स्टॅम्प, बनावट चेक आणि स्वाक्षरीद्वारे चार टप्यात 47 लाख 60 हजार काढल्याची माहिती समोर आली आहे
शालेय शिक्षण विभागाचे बनावट स्टॅम्प, बनावट चेक आणि स्वाक्षरीद्वारे चार टप्यात 47 लाख 60 हजार काढल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी मरीनड्राइव्ह पोलिस ठाण्यात चौघांवर कलम 419, 420, 465, 467, 471, 473, 34 भादवी अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
शालेय शिक्षण विभागाच्या मंत्रालय येथील बँकेत असलेल्या खात्यातून हा गैरप्रकार घडला आहे.