पुणे : मुलींच्या शिक्षणाला शासनाची सर्वाधिक प्राथमिकता आहे. त्यासाठीच आठ लाखांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेल्या कुटुंबातील मुलींना मोफत शिक्षण देण्याची घोषणा मध्यंतरी केली होती. मात्र, लोकसभा आणि आता मुंबईत लागू असलेल्या आचारसंहितेमुळे त्याचा शासनादेश जाहीर होण्यास विलंब झाला. लवकरच त्याची कार्यवाही पूर्ण होऊन शासनादेश लागू होईल, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुण्यातील कार्यक्रमात दिली.
श्री शुल्क यजु: शाखीय माध्यंदिन महाराष्ट्रीय ब्राह्मण सभा पुणेतर्फे कसबा पेठेतील याज्ञवल्क्य आश्रमाच्या जागेत उभारण्यात येत असलेल्या सांस्कृतिक भवनाचे भूमिपूजन पाटील यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. भाजपचे प्रदेश प्रवक्ते संदीप खर्डेकर, संस्थेचे मनोज तारे, प्रमोद चंद्रात्रे, जगदीश नगरकर, भाजप नेते हेमंत रासने, स्वरदा बापट, माजी नगरसेविका मंजुश्री खर्डेकर, गायत्री खडके, माजी नगरसेवक राजेश येनपुरे या वेळी उपस्थित होते
GR kadhi yenar