मुंबई: राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार स्थापन झालं आहे. देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे उपमुख्यमंत्री झाले आहेत. मात्र, विरोधी पक्षनेतेपदसाठी आवश्यक असणाऱ्या जागा देखील महाविकास आघाडीला मिळाल्या नाहीत. त्यामुळं महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणार की नाही? अशी चर्चा सुरु आहे. याच विषयावरुन काल महाविकास आघाडीच्या नेत्यांनी विधानभवनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी विधानसभा अध्यक्षपदासाठी महाविकास आघाडीनं अर्ज भरला नाही. पण त्याबदल्यात विधानसभा उपाध्यक्षपद आणि विरोधी पक्षनेतेपदासाठी या नेत्यांनी प्रस्ताव ठेवला, अशी माहिती ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी दिली. त्यामुळे उद्धव ठाकरेंची मागणी देवेंद्र फडणवीस मान्य करणार का?, अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.
1999 पासून ची परंपरा होती. सत्ताधाऱ्यांकडे विधानसभा अध्यक्षपदस्थ तर विरोधकांकडे विधानसभेचे उपाध्यक्ष पद…भाजप आणि शिवसेनेच्या काही चुकांमुळे ही परंपरा खंडित झाली होती. त्यामुळे ही परंपरा पुन्हा सुरू करावी आणि उपाध्यक्ष पद मिळावं अशी विनंती आम्ही देवेंद्र फडणवीसांसमोर केली. आमच्या या मागणीवर देवेंद्र फडणवीसांची देखील सकारात्मकता दिसली, असं भास्कर जाधव यांनी सांगितले.
विरोधी पक्षनेतेपदासाठी एका पक्षाकडे सभागृहाच्या सदस्यसंख्येच्या 10 टक्के आमदार असणं आवश्यक आहे. महाराष्ट्रात विधानसभा सदस्यांची एकूण संख्या 288 आहे. त्यामुळे राज्यात विरोधी पक्षनेता ठरवण्यासाठी कोणत्याही एका पक्षाकडे किमान 29 आमदारांचं संख्याबळ आवश्यक आहे. विरोधी बाकावरच्या महाविकास आघाडीतील पक्षांपैकी ठाकरेंच्या शिवसेनेकडे 20, काँग्रेसकडे 15, तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे 10 आमदार आहेत. त्यामुळे विरोधी पक्षनेतेपद मिळाल्या