महायुतीचा शपथविधी कोणत्याही दिवशी होऊ शकतो. केंद्रीय नेतृत्वाकडून मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर शपथविधी पार पडेल. त्याआधी पालकमंत्री आणि मंत्रिपदावरुन चर्चा सुरु आहे. कोणाला कोणतं खातं मिळणार, कुणी लॉबिंग केली. पण ५० पेक्षा कमी वय असेल तरच मंत्रिपद मिळेल, अशी माहिती समोर आली.
नव्या सरकारमध्ये तरुण चेहऱ्यांना सर्वाधिक संधी मिळण्याची शक्यता आहे. जेष्ठ अनुभवी नेत्यांचे पत्ते कट होणार आहेत. यामध्ये कोणाचा समावेश असेल, याबाबत लवकर माहिती समोर येईल. तरूण तडफदार नेत्यांना मंत्रीमंडळात स्थान मिळणार असल्याचे समजतेय. ५० पेक्षा कमी वय असणाऱ्यांचा मंत्री मंडळात स्थान देण्यावर भर देणार असल्याचे समजतेय. दिल्लीत देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्का मोर्तब झाल्यावर इतर मंत्र्याचीही नावे निश्चित होणार असल्याचे समजतेय.