मुंबई: राज्य शासनाने १३ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. त्यानुसार महसूल विभागाच्या अप्पर मुख्य सचिवपदी राजेश कुमार, वित्त विभागाच्या सचिवपदी ओ. पी. गुप्ता तर सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालकपदी विजय सिंघल यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
राजेश कुमार यांची महसूल विभागाच्या अप्पर मुख्य सचिवपदी तर गुप्ता यांची वित्त विभागाचे अप्पर मुख्य सचिवपदी नियुक्ती केली आहे. संजय सेठी यांची नियुक्ती परिवहन व बंदरे विभागाचे अप्पर मुख्य सचिव पदावर केली आहे. बेस्टचे महाव्यवस्थापक विजय सिंगल यांची नियुक्ती सिडकोचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकपदी तर मिलिंद शंभरकर यांची मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी, पराग जैन नैनोटिया यांची प्रधान सचिव (माहिती तंत्रज्ञान), एम. जे. प्रदीपचंद्र यांची नियुक्ती अतिरिक्त विकास आयुक्त (उद्याोग) येथे करण्यात आली आहे. याशिवाय पुणे विभागीय अतिरिक्त आयुक्तपदी कविता द्विवेदी, बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्प संचालकपदी डॉ. हेमंत वसेकर, पशुसंवर्धन आयुक्त कौस्तुभ दिवेगावकर तर पुणे स्मार्ट सिटीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्तिकी एन. एस. यांची बदली करण्यात आली आहे.