राज्यात लोकसभा निवडणुकीआधी प्रशासनात मोठे फेरबदल करणे सुरु आहेत. काही दिवसांपूर्वीच ५८ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या होत्या. त्यानंतर आता राज्यातील ७ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत.
1. श्री सौरभ राव (IAS:MH:2003) विभागीय आयुक्त, पुणे विभाग, पुणे यांची आयुक्त, सहकार आणि निबंधक, सहकारी संस्था, पुणे या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
2. श्री अनिल एम. कवाडे (IAS:MH:2003) आयुक्त, सहकार आणि निबंधक, सहकारी संस्था, पुणे यांची साखर आयुक्त, पुणे म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
3. श्री अनिल पाटील (IAS:MH:2012) मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, गोंदिया यांची व्यवस्थापकीय संचालक, Haffkine Bio-pharma Corporation, Mumbai या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
4. श्री डी.के.खिलारी (IAS:MH:2013) मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सातारा यांची संचालक, इतर मागास बहुजन कल्याण, पुणे म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
5. श्री राहुल गुप्ता (IAS:MH:2017) मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, धाराशिव सह व्यवस्थापकीय संचालक, MAHADISCOM, छत्रपट्टी संभाजी नगर.
6. श्री मुरुगनंथम एम (IAS:MH:2020) प्रकल्प अधिकारी, ITDP, चंद्रपूर आणि सहायक जिल्हाधिकारी, चंद्रपूर उपविभाग, चंद्रपूर यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, गोंदिया या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
7. श्रीमती. यशनी नागराजन (IAS:MH:2020) प्रकल्प अधिकारी, ITDP, पांढरकवडा आणि सहायक जिल्हाधिकारी, केळापूर उपविभाग, यवतमाळ यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सातारा म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
लोकसभा निवडणुक प्रशासनात मोठे फेरबदल राज्यातील 7 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या
- Advertisement -