Tuesday, February 27, 2024

राज्यातील चार IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, शिंदे सरकारने घेतला निर्णय

राज्यातील ४ प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या (IAS) शिंदे सरकारने मंगळवार, २३ जानेवारी रोजी बदल्या केल्या.

त्यामध्ये करिष्मा नायर (IAS) यांची बीड उप विभागातील सहाय्यक जिल्हाधिकारी यांची नांदेड कंधार उप विभागातील सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून बदली करण्यात आली आहे.

नाशिकमधील चांदवड उपविभाग, सहाय्यक जिल्हाधिकारी पुलकित सिंग (IAS) यांची बुलढाणा येथे बुलढाणा उपविभागाच्या सहायक जिल्हाधिकारी पदावर बदली करण्यात आली आहे.

यवतमाळमधील पुसद उपविभागाचे सहाय्यक जिल्हाधिकारी सुहास गाडे (IAS) यांची अमरावती येथील दर्यापूर उप विभागाच्या सहाय्यक जिल्हाधिकारी पदावर बदली करण्यात आली आहे.

चंद्रपूर येथील बल्लारपूर उपविभागाचे सहाय्यक जिल्हाधिकारी मानसी (IAS)यांची बुलढाणा येथील मलकापूर उप विभागाचे सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून बदली करण्यात आली आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles