Tuesday, February 27, 2024

राज्यातील ३२ वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या.‌…राज्य सकारचे आदेश

राज्यात प्रशासनाने मोठे फेरबदल केले असून राज्यातील 32 वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.यात भारतीय पोलीस सेवा आणि राज्य पोलीस सेवेतील अधिकाऱ्यांचा समावेश आहे.वाहतूक विभागाचे अपर पोलीस महासंचालक रविंद्र कुमार सिंघल हे नागपूर शहराचे पोलीस आयुक्त असणार आहेत.

गडचिरोली विभागाचे पोलीस उपमहानिरीक्षक संदीप पाटील यांना बढती देण्यात आली असून नक्षलविरोधी अभियानाचे विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. अजयकुमार बन्सल जालना जिल्ह्याचे नवीन पोलीस अधीक्षक असणार आहेत. यापूर्वी अजय कुमार बन्सल मुंबई विभागाचे पोलीस आयुक्त म्हणून कार्यरत होते.

दोन महिने पुण्याचे पुणे पोलिस दलातील सह पोलिस आयुक्तपद रिक्त होते. त्याजागी कोकण परीक्षेत्राचे महानिरीक्षक प्रवीण पावर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या अतिरिक्त पोलिस आयुक्तपदी शैलेश बलकवडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles