Sunday, December 8, 2024

कृषी विभागात भरती प्रक्रिया… दहावी उत्तीर्णांना संधी

राज्य शासनाच्या कृषी विभागाकडूनलघुटंकलेखक, लघुलेखक (उच्च श्रेणी), लघुलेखक (निम्न श्रेणी), वरिष्ठ लिपिक आणि सहायक अधीक्षक या पदांसाठीच्या रिक्त जागा भरण्यासाठीची नवीन भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. उमेदवरांना या भरतीसाठी http://www.krishi.maharashtra.gov.in या बेवसाईटवर ऑनलाइन अर्ज करता येणार आहेत. तर या भरती अंतर्गत एकूण २१८ जागा भरल्या जाणार आहेत.

अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख – १३ जुलै २०२३
अर्ज करण्याची शेवटची तारीख – २२ जुलै २०२३
शैक्षणिक पात्रता –

लघुलेखक – १० वी पास/शॉर्ट हँड ८० WPM आणि इंग्रजी टायपिंग ४० WPM किंवा मराठी टायपिंग ३० WPM.

लघुलेखक (उच्च श्रेणी) – १० वी पास/शॉर्ट हँड १२० WPM आणि इंग्रजी टायपिंग ४० WPM किंवा मराठी टायपिंग ३० WPM

स्टेनोग्राफर – १० वी पास/शॉर्ट हँड १०० WPM आणि इंग्रजी टायपिंग ४० WPM. किंवा मराठी टायपिंग ३० WPM

वरिष्ठ लिपिक – किमान द्वितीय श्रेणी पदवी

सहाय्यक अधीक्षक – कोणत्याही शाखेतील पदवी.

भरती प्रक्रिया – मुलाखतीद्वारे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles