Sunday, July 21, 2024

मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना..अर्ज करण्यासाठी या महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिन्याकाठी महिलांना १ हजार ५०० रुपये मिळणार आहेत. त्यासाठी २१ ते ६० वयोगटातील महिला (वार्षिक अडीच लाख रुपये उत्पन्न मर्यादा) या योजनेसाठी पात्र असणार आहेत. त्यासाठी अर्ज करण्यास उद्यापासून (सोमवारी) प्रारंभ होणार आहे.

लाभार्थी महिलांना 15 दिवसात कधीही त्यांच्या गावातील महा- इ-सेवा केंद्रावर जाऊन अर्ज करता येईल.
कोणत्या महिला असणार पात्र?

– महिला महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणे आवश्यक

– विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या, निराधार महिला

– वयाची किमान २१ वर्ष पूर्ण व कमाल ६० वर्ष मर्यादा

– अर्ज करणाऱ्या महिलांचे बँक खाते असणे आवश्‍यक

– अर्जदार महिलेच्या कुटुंबांचे एकत्रित वार्षिक उत्पन्न २ लाख ५० हजारांपेक्षा जास्त नसावे

– अन्य विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे दीड हजार रुपयांपेक्षा जास्त लाभ घेतला नसेल

– ट्रॅक्टर वगळून चारचाकी वाहन नावावर नसेल, अशा महिला.
ही कागदपत्रे जोडणे बंधनकारक

– ऑनलाइन संकेतस्थळावर अथवा प्रत्यक्ष अर्ज करावा

– आधार कार्ड आवश्‍यक

– राज्याचे अधिवास प्रमाणपत्र अथवा राज्यातील जन्म दाखला

– बँक खात्याच्या पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत

– पासपोर्ट आकाराचा फोटो, रेशनकार्ड

– योजनेच्या अटी-शर्तींचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र

– अर्ज दाखल करताना अर्जदार महिला प्रत्यक्ष उपस्थित राहणे आवश्‍यक
अर्ज भरण्याची सुविधा

अंगणवाडी केंद्रात, बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालये, ग्रामपंचायत व महापालिकेचे वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्र व महा- इ- सेवा केंद्रे येथे पात्र महिलांना योजनेचा अर्ज भरता येणार आहे.
अर्ज भरण्याची प्रक्रिया

– अर्ज करण्याची सुरुवात : १ जुलै

– अर्ज करण्याची शेवट तारीख : १५ जुलै

– प्रारूप निवड यादी प्रकाशित : १६ ते २० जुलै

– प्रारूप यादीवर हरकत, तक्रार करणे : २१ ते ३० जुलै

– लाभार्थी अंतिम निवड यादी प्रकाशित : १ ऑगस्ट

– लाभ देण्यास सुरुवात : 14 ऑगस्टपासून

‘मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी उद्यापासून (सोमवारी) अर्ज करता येणार असून त्याचे संकेतस्थळ लाभार्थींना उपलब्ध करून दिले जाईल. प्राप्त अर्जांची पडताळणी अंगणवाडी पर्यवेक्षक, प्रकल्प अधिकारी, अंगणवाडी सेविका करतील. ग्रामसेवक देखील अर्जांची पडताळणी करू शकतात. त्यांच्याकडील अर्ज आमच्याकडे आल्यावर आम्ही यादी अंतिम करून जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करू. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समिती लाभार्थींची अंतिम यादी जाहीर करेल आणि त्यांना लाभ मिळेल.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles