लोकसभा निवडणुकीत महायुतीला धक्का बसला. राज्यात ४५ जागा जिंकण्याचं लक्ष्य ठेवलेल्या महायुतीला अवघ्या १७ जागा मिळाल्या. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा भाजप आणि शिंदेसेनेच्या उमेदवारांना अपेक्षित फायदा झालाच नसल्याचं आकडेवारीवरुन स्पष्ट झालं आहे. दादा गटाचे आमदार असलेल्या बऱ्याच मतदारसंघांमध्ये महायुतीचे उमेदवार पिछाडीवर पडल्याचं आकडेवारी सांगते. त्यामुळे महायुतीत तिसऱ्या पक्षाची गरज काय, असा दबाव आणण्यास भाजप नेत्यांनी सुरुवात केली आहे.भाजप आणि शिंदेसेनेतील काही नेत्यांनी अजित पवारांना सोबत ठेवण्याचा पुनर्विचार करावा, अशी मागणी आपापल्या नेतृत्त्वाकडे केली आहे.अजित पवार गटाच्या आमदारांची मतं भाजप, शिंदेसेनेकडे वळली नसल्याचा तर्क आकडेवारीच्या आधारे दिला जात आहे. जिथे अजित पवारांची राष्ट्रवादी लढत नव्हती, तिथल्या कार्यकर्त्यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचं काम केल्याचा संशय भाजप, शिंदेसेनेच्या नेत्यांना आहे. त्यामुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सोबत ठेवून उपयोग काय, उलट त्यांच्यामुळे नुकसानच होत असल्याची भावना नेत्यांची आहे.
अजित पवारांचा उपयोग नाही, महायुतीत ठेवायचं कशाला? भाजप, शिंदे सेनेतील नेत्यांची भावना
- Advertisement -