भाजपने विधानसभा निवडणुकीत 155 मतदारसंघांमध्ये आपले उमेदवार उभे करण्याची तयारी सुरु केल्याची माहिती आहे. भाजपकडून एकनाथ शिंदे यांच्या नेतृ्त्वाखालील शिवसेनेसाठी 60 ते 65 आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेससाठी 50 ते 55 जागा सोडण्याची तयारी असल्याचे समजते. तर महायुतीमधील अन्य तीन मित्रपक्षांसाठी 15 जागा राखून ठेवण्याची भाजपची योजना असल्याचे समजते. त्यामुळे आता जागावाटपाच्या चर्चेवेळी रामदास आठवले, राज ठाकरे, एकनाथ शिंदे आणि अजित पवार काय भूमिका घेणार, हे पाहावे लागेल.
शिंदे गट 100 तर अजित पवार गट तब्बल 90 जागांवर लढण्यासाठी आग्रही असल्याची माहिती नुकतीच समोर आली होती. अशातच रिपाईचे सर्वेसर्वा रामदास आठवले यांनीही 10 जागांची मागणी केली आहे. तर दुसरीकडे लोकसभा निवडणुकीत महायुतीला बिनशर्त पाठिंबा देणारा राज ठाकरे यांचा मनसे पक्ष विधानसभेच्या 20 जागांवर लढण्याची शक्यता आहे. मात्र भाजपने दीडशे पेक्षा जास्त जागा लढण्याची तयारी चालविली आहे.