मराठा आरक्षणावरून मंत्री छगन भुजबळ आणि मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्यातील वाद शिगेला पोहोचला आहे.
भुजबळांवर जरांगेंनी पुन्हा तोफ डागली आहे. “येवल्याच्या येडपटाला पाडू, त्यांना हिसका दाखवायला वेळ लागणार नाही, उंबऱ्याच्या बाहेर पडू देणार नाही,” असा थेट हल्ला जरांगेंनी भुजबळांवर केला.
मराठा व ओबीसी बांधवांमध्ये वाद लावण्याचा त्यांचा इरादा आहे.आपला राजकीय फायदा त्यांना करून घ्यायचा आहे.ओबीसी बांधवांनो त्यांचे ऐकू नका. शांत रहा, शहाणे व्हा.सध्या भुजबळ यांना संताजी धनाजी सारखे मराठे पाण्यात दिसत आहे .त्यांच्या डावापासून सावध राहा,” अशा सूचना जरांगे यांनी मराठा समाजाला दिल्या.
महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा वारसा सांगणाऱ्या भुजबळांनी स्वतःचे नाव शाळा, महाविद्यालयांना दिले.तर मराठ्यांनी आपल्या जमिनी शाळांसाठी दिल्या,असे सांगताना त्यांनी आमची लायकी काढता कशाला,आमची बरोबरी करू शकत नाही. येवल्याच्या येडपडाला पाडू,त्याला हिसका दाखवायला वेळ लागणार नाही,उंबऱ्याच्या बाहेर पडू देणार नाही,” असा इशारा त्यांनी दिला.