Saturday, March 2, 2024

नाशिक दौऱ्यावर माझ्यावर गाडी घालण्याचा प्रयत्न…मनोज जरांगे यांनी केला गौप्यस्फोट

मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. नाशिक दौऱ्यावर असताना माझ्यासोबत घातपाताचा प्रकार करण्याचा प्रयत्न झाला. तसेच अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्नही करण्यात आला, पण सुदैवाने आम्ही वाचलो, असं जरांगे यांनी सांगितलं आहे. अंतरवाली सराटी येथे घेतलेल्या पत्रकारपरिषदेत ते बोलत होते. मनोज जरांगे यांनी माध्यमांसोबत संवाद साधताना मोठा गौप्यस्फोट केला. नाशिक जिल्ह्यात दौरा करत असताना साल्हेर किल्ल्याजवळ माझ्यासोबत घातपाताचा प्रयत्न झाला. तसेच अंगावर गाडी देखील घालण्याचा प्रयत्न करण्यात आला. पोलिसांनी त्या वाहनचालकाला ताब्यात घेतले होते, असं जरांगे म्हणाले.

आम्ही साल्हेर किल्ल्याजवळ असताना अचानक एक पिकअप सारखी गाडी प्रचंड वेगात आली. ही गाडी आमच्या अंगावर आली असती तर आमचा भुगा झाला असता. पण एकाने जोराने आवाज दिल्याने लोकं उड्या मारून बाजूल पडले, असा थरारही जरांगे यांनी सांगितला. आम्ही अशा घटना सांगत बसत नाही, असा अप्रत्यक्ष टोलाही त्यांनी भुजबळ यांना लगावला.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles