Friday, June 14, 2024

तर सर्व समाजाला बरोबर घेऊन विधानसभा निवडणुकीत उतरणार… मनोज जरांगे पाटलांचा इशारा

छत्रपती संभाजीनगर : कोणाला पाडायचे आहे त्यांना पाडा, या निवडणुकीमध्ये सारे नेते एका व्यासपीठावर आले. मराठा एकीतून निर्माण झालेल्या मतांचे भय वाटू लागले आहे. यापुढील काळात सगेसोयरेच्या अंमलबजावणीसाठी ४ जूनपासून पुन्हा उपोषण सुरू करणार आहे. जर आरक्षणाच्या प्रश्नावर सरकार पावले उचलणार नसेल, तर विधानसभेत सर्व समाजाला बरोबर घेऊन निवडणुकीमध्ये उतरू, असे मनोज जरांगे यांनी शनिवारी सांगितले.

लोकसभेच्या पाचव्या टप्प्यात कोणालाही पाठिंबा दिलेला नाही, असे स्पष्ट करताना मुलांच्या भवितव्यासाठी एकजुटीने मतदान करा, असे आवाहन त्यांनी केले आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी सगेसोयरेची अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी बेमुदत उपोषण तर होणार आहे. याशिवाय आंदोलनाचे काय टप्पे असतील, याचे स्वरूप अजून ठरलेले नाही. तेही समाजातील प्रमुखांना सांगितले जाईल, असे जरांगे यांनी सांगितले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles