Wednesday, April 17, 2024

फडणवीस यांचा खेळ भरत आला आहे…जे जाहीर करणार आहे, ते अतिशय धक्कादायक असेल

अशोक चव्हाण यांच्या माध्यमातून आता देवेंद्र फडणवीस सूडाचे राजकारण करत आहेत. देवेंद्र फडणवीस यांचा खेळ भरत आला आहे. थोडी माहिती मिळू द्या. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांचे नाव घेऊन सगळे जाहीरपणे सांगतो. जे जाहीर करणार आहे, ते अतिशय धक्कादायक असेल. सगळ्यांना त्यातून धक्काच बसेल, असा एल्गार मनोज जरांगे यांनी केला. जो काही धक्कादायक खुलासा करणार आहे, त्याची एक झलक तुम्हाला सांगतो. देवेंद्र फडणवीस यांनी दुसरी चाल रचली आहे. यामध्ये एकनाथ शिंदे हेदेखील सामील आहेत. कारण तो माणूस एकनाथ शिंदे यांचा आहे. कारण यांना मराठ्यांना आरक्षण द्यायचे नाही. गोरगरीब मराठ्यांवर फक्त अन्याय करायचा आहे. या सगळ्या गोष्टी गृहमंत्री त्यांचा पदाचा वापर करून करणार आहेत. तुमच्या कार्यकर्त्यांनी घोषणा दिल्या, तर त्यांच्यावरही ३५३ लावणार का, अशी विचारणा मनोज जरांगे पाटील यांनी केली.

दरम्यान, आता आम्ही मराठे जशास तसे उत्तर देणार आहोत आणि जे घडेल, त्याला जबाबदार गृहमंत्री असतील, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला. या निवडणुकीसाठी मराठा समाजाने एकही उमेदवार दिलेला नाही आणि माझा कुणालाही पाठिंबा नाही, हे जाहीरपणे सांगतो.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles