पोलीस भरती प्रक्रिया लवकरात लवकर सुरू करण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी यांना निवेदन. ट्रिपल इंजन सरकार मेगा भरतीचे गाजर दाखवत असल्याचा आरोप- अभिषेक कळमकर. नगर (प्रतिनिधी)- अहमदनगर जिल्ह्यातील महाराष्ट्र पोलीस भरती करणारे उमेदवार हे पोलीस भरतीची तयारी करत आहे व सध्या गृह विभागातील २०२२ व २३ या सालची पदे रिक्त असल्यामुळे उमेदवारांची लवकरात लवकर पोलीस भरती प्रक्रिया सुरू करण्यात यावी तसेच मागील ३ मार्च २०२३ रोजी या सामान्य प्रशासन विभागामार्फत दोन वर्ष वयोमर्यादा वाढवून देण्यात आलेली आहे मात्र ३१ डिसेंबर पूर्वी पोलीस भरती प्रक्रियेची जाहिरात न निघाल्यास अनेक विद्यार्थी वयोमर्यादेमुळे अपात्र ठरतील त्यामुळे येणाऱ्या ३१ डिसेंबर २०२३ पूर्वी पोलीस भरतीची जाहिरात काढावी व उमेदवारांचे अर्ज भरून घेण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांना निवेदन देण्यात आले यावेळी राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर समवेत किरण दहिफळे, आदित्य काळे, भारत जाधव, भाऊसाहेब बामदले, राहुल बहिर, सोपान नाकाडे, जालिंदर कुसेकर, शिवदास मिसाळ, सुरेश सर्जे, आकाश कासार, भूषण बेरड, अभिषेक ढाकणे, अभिषेक पवार, आदित्य बागल, बाबासाहेब हजारे, पृथ्वी मुळे, अजिंक्य चौधरी, मयूर धोत्रे, शुभम वाघ, अभय कवडे, कार्तिकी झोंड, पुनम वाळुंजकर, सानिका गायवळ, प्रियंका शिंदे, मयुरी मकासरे, गायत्री चेपटे, अश्विनी बडे, राम गोकुळ आदीसह मोठ्या संख्येने युवक उपस्थित होते.
यावेळी माझी महापौर तथा राष्ट्रवादीचे शहर जिल्हा अध्यक्ष अभिषेक कळमकर म्हणाले की, महाराष्ट्र राज्याचे वेळोवेळी प्रशासनाकडून म्हटले जाते की, पोलीस मनुष्यबळाची कमतरता आहे. राज्य शासन म्हणते की, लवकरात लवकर भरती घेऊ मात्र पोलीस भरती करणाऱ्या गोरगरीब शेतकऱ्यांचे मुले व ग्रामीण भागातील अनेक उमेदवार यांच्या वयोमर्यादा संपल्यावर कुठल्याही पर्याय राहणार नाही. तसेच जिल्ह्यातील अनेक तरुण तरुणी हे नगर शहरात शहरातील अकॅडमी मध्ये सराव घेतात दररोज ग्राउंड करून अभ्यास करतात व त्यांना राहण्याचे व खाण्याचे खर्च देखिल भागवत नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील युवक युती आपापले भविष्य उज्वल करण्यासाठी शहरात येतात मात्र हे भरतीचे निर्णय होत नसेल तर या राज्याची शोकांकिता आहे. सरकार फक्त मेगाभरतीचे गाजर दाखवत आहे. व प्रत्यक्षात कुठलीही भरती होत नसल्याने अनेक युवकांनी आत्महत्येचे देखील प्रयत्न केलेले आहे व नगर जिल्ह्यात ही अशीच परिस्थिती आहे एकीकडे रोजगार देऊ असे सांगायचं आणि प्रत्यक्षात युवकांना फक्त आशेला लावायचं काम सध्याचे सरकार करीत आहे. त्यामुळे येणाऱ्या हिवाळी अधिवेशनात लोकसभेत खासदार सुप्रियाताई सुळे व विधानसभेत आमदार रोहित पवार हे ट्रिपल इंजन सरकार विरोधात पोलीस भरती प्रक्रिया संदर्भात आवाज उठवणार असल्याचे माझी महापौर अभिषेक कळमकर म्हणाले.