राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जुलै २०२३ मध्ये उभी फूट पडली होती. अजित पवार यांच्यासही काही आमदारांनी शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला होता. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून अजित पवार गटाविरोधात अपात्रतेची याचिका दाखल केली होती. या याचिकांवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर सुनावणी सुरू आहे. आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मंगळवारी साक्ष नोंदवण्यात आली.
आमदार आशुतोष काळे यांनी निवडणूक आयोगासमोर दाखल केलेल्या पत्रावर सहीवरून जितेंद्र आव्हाडांनी सवाल उपस्थित केला आहे. “मला जुलै महिन्यात शिर्डीला जायचं होतं. यासाठी मी आशुतोष काळेंच्या निकटवर्तीयाला शिर्डीला जाण्याआधी फोन केला. तेव्हा आशुतोष काळे विदेशात असून १२ ते १५ जुलैपर्यंत देशात येणार नाहीत, असं सांगण्यात आलं. पण, निवडणूक आयोगासमोर दाखल करण्यात आलेल्या पत्रात आशुतोष काळेंची सही होती. ही सहीच खोटी आहे. कारण, आशुतोष काळे भारतात नव्हते, तर सही कुठून आली?” असा प्रश्न आव्हाडांनी उपस्थित केला