दिवंगत आर आर आबा पाटील यांचे चिरंजीव आणि नवनियुक्त आमदार रोहित पाटलांनी सांगितलं. या सगळ्यात पहिला आपल्या आजीने सांगितलं होतं की काही झालं तरी पवार साहेबांना सोडू नकोस अशी आठवणही त्यांनी सांगितली. रोहित पाटील हे देशातील सर्वात तरुण आमदार ठरले आहेत. एबीपी माझाच्या माझा कट्टा या कार्यक्रमात बोलताना त्यांनी आर आर पाटलांच्या आठवणींना उजाळा दिला.
राष्ट्रवादीच्या फुटीनंतर रोहित पाटलांनी शरद पवारांची साथ देण्याचा निर्णय घेतला होता. त्यावर बोलताना रोहित पाटील म्हणाले की, “काही झालं तरी म्हाताऱ्याची साथ सोडू नकोस. नाहीतर घरात घेणार नाही असा दम माझ्या आजीने पहिल्याच दिवशी दिला. तसेच आपल्या चुलत्यांनाही तसाच दम तिने दिला. त्यानंतर आपल्या मतदारसंघातील लोकांची भावना काय आहे हे अनेकांनी सांगितलं. त्यासंबंधी अनेकांशी चर्चा केली.”
लोकांशी चर्चा केल्यानंतर आपण आरेवाडीला गेलो होतो. त्यावेळी रोहित पवार आणि पवार साहेबांचा फोन आला. दुसऱ्या दिवशी कराडमध्ये यशवंतराव चव्हाणांच्या समाधीच्या ठिकाणी ते येणार होते. त्या ठिकाणी आपल्या मतदारसंघातील दोन हजार कार्यकर्त्यांना घेऊन आपण पवार साहेबांची भेट घेतली आणि आपली भूमिका स्पष्ट केली असं रोहित पाटील यांनी सांगितलं.