Monday, July 22, 2024

तुम्हाला बहिणीविरोधात लढवले अन् बहिणीची योजना काढायला लावली,भर सभागृहात अजित दादांना…

विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवार यांनी आज सभागृहात सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. त्यांनी सरकारच्या अर्थसंकल्पावर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भाषणावर कठोर टीका केली. “मी फार आकडेवारीत जाणार नाही. जनता सर्व बघत होती. मुख्यमंत्र्यांचे भाषण राज्यपालांच्या अभिभाषणावर होत की बजेटवर? मुख्यमंत्री कुरघोडी अर्थमंत्र्यांवर करत आहेत,” असे ते म्हणाले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणात विधानसभा निवडणुकीनंतर काही लोकांना तीर्थस्थळावर जाण्याची वेळ येऊ शकते, असे म्हटले होते. सरकारने ती तजवीज करुन ठेवलीय.पण विजयराव तुमच्यावर ती वेळ येणार नाही, असे शिंदे म्हणाले होते.

यावरुन वड्डेटीवारांनी अजित पवारांना सल्ला दिला, “दादा तुम्ही बजेट मांडला पण तुम्ही दबावाखाली आहात. भाजपने तुम्हाला आधीच अग्नीवीर केलं आहे का? दादा, तुम्ही सांभाळून राहा नाहीतर तुमची तीर्थयात्रा करून आणतील.”

वड्डेटीवारांनी अजित पवारांना अजून टोला मारला, “योजना तुम्ही मांडण्याऐवजी त्यांनी मांडली. तुम्हाला बहिणीविरोधात लढवले आणि आता बहिणीची योजना काढायला लावली.”

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles