महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचं निकाल लागून १२ दिवस झाले आहेत तरी राज्यात सरकार स्थापन झाले नाही. अशातच आज महायुतीकडून सत्तास्थापनेता दावा केला गेला. सत्ता स्थापनेचा दावा करण्यापूर्वी भाजपच्या गटनेत्याची निवड केली गेली. देवेंद्र फडणवीस यांचा मार्ग अखेर मोकळा झालेला आहे. पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांची विधीमंडळाचा नेता म्हणून निवड करण्यात आली. त्यामुळे फडणवीस हेच मुख्यमंत्री होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.
उद्या ०५ डिसेंबर रोजी फडणवीस यांचा आझाद मैदानावर शपथविधी सोहळा होणार आहे. मुख्यमंत्रिपदाच्या शपथविधीनंतर राज्याचे 21 वे मुख्यमंत्री म्हणून फडणवीस राज्याचा कारभार सांभाळतील. भाजपच्या कोर कमिटीमध्ये फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. केंद्रातून आलेल्या दोन निरीक्षकांच्या उपस्थितीत आज विधिमंडळ बैठकीपूर्वी कोर कमिटीची बैठक पार पडली.या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला सर्व प्रमुख नेत्यांनी मुख्यमंत्री पदासाठी सहमती दिली. गुजरातचे माजी मुख्यमंत्री, आदरनीय रुपणीजी, त्यांच्यासोबत आलेल्या भारताच्या वित्तमंत्री, आदरनीय निर्मला सीतारामनजी, आपले अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेजी माननीय विनोद तावडे, माननीय शिवप्रकाशजी, मंचावर उपस्थित असणारे सरमाननीय आशिष शेलारजी, प्रवीण दरेकरजी, भारतीय जनता पक्षाचे विधानमंडळातील माझे सर्व ज्येष्ठ सहकारी कोर कमिटीचे सर्व सदस्य यांचे देवेंद्र फडणवीस यांनी आभार मानले.
कठीण वेळेत स्थिर रहानारा,जनहिताचे योग्य निर्णय घेणारा,विस्वासु मित्र जमा करणारा योग्य माणुसाचे अभिनंदन !!! मा देवेन्द्रजी ना हार्दिक शुभेच्छा!!!