शिवसेना शिंदे गटाने हिंगोलीसाठी हेमंत पाटील यांची उमेदवारी जाीहर केली. त्यानंतर अर्ज दाखल करण्याच्या शेवटची दिवशी उमेदवारी रद्द केली. यवतमाळ-वाशिममध्येही संजय राठोड की भावना गवळी हे ठरत नसताना हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना उमेदवारी जाहीर केली. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी याबद्दल प्रतिक्रिया देताना म्हटले की, भाजपाने शिंदे गट आणि अजित पवार गटाला ताटाखालचे मांजर बनवून ठेवले आहे. दोन्ही गटाच्या म्हणण्याला काही अर्थ नाही. जे भाजपा म्हणेल, तेच या लोकांना करावे लागेल. एखाद्या पक्षाचा उमेदवार दुसऱ्याच पक्षाने ठरवावा, असे कधीही महाराष्ट्रात झाले नव्हते. शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे शिवसेनेचे नेतृत्व करत होते, त्यावेळेस आमचे उमेदवार बदलण्याची हिंमत भाजपाने कधीही केली नाही. जागावाटप हे पक्षाचे होत असते त्यांनी त्यांचा-त्यांचा उमेदवार ठरवायला पाहिजे, अशा प्रकारची भूमिका असते, परंतु भाजपाने आता ही नवीनच नीती अवलंबली आहे. शिंदे गटाला जवळपास घेरलेले आहेच. कृपाल तुमाने, हेमंत पाटील, भावना गवळी यांचे तिकीट कापण्यात आले आहे. हातकंणगलेमदून धैर्यशील माने यांना विरोध सुरू आहे. ठाणे आणि कल्याण सहजासहजी मिळत नाही. रत्नागिरी-सिंधुदुर्ग मिळत नाही, रायगड मागण्याचा प्रयत्न केला. पण यात त्यांना यश मिळाले नाही. शिंदे गट आता दोन-चार महिन्यांचा पक्ष आहे. विधानसभेपर्यंत हा पक्ष राहिल, असे मला वाटत नाही”, असे मोठे विधान विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला.
भाजपाने शिंदे गट आणि अजित पवार गटाला ताटाखालचे मांजर बनवून ठेवले आहे….
- Advertisement -