Sunday, July 14, 2024

खोट्या पुराव्यावर ५७ लाख मराठ्यांना कुणबी जातप्रमाणपत्रे… छगन भुजबळांचा आरोप

जातनिहाय जनगणना करावी या मागणीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची समता परिषदेच्या वतीने भेट घेण्यात येणार असल्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी सोमवारी जाहीर केले.

मराठा आरक्षण देताना ओबीसी आरक्षणाला धक्का लावणार नाही, याची राज्य सरकारने लेखी हमी द्यावी, या मागणीसाठी पुणे, जालना येथे उपोषण सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर सोमवारी वांद्रे येथील एमईटी संस्थेच्या संकुलात राज्यातील ओबीसी कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. बैठकीनंतर भुजबळ म्हणाले, की अनुसूचित जाती व जमातीला ज्याप्रमाणे लोकसंख्येच्या प्रमाणात निधी मिळतो, तसा ओबीसींना मिळत नाही. त्यामुळे जातवार जनगणना झाली पाहिजे. खोट्या पुराव्यावर ५७ लाख मराठ्यांना कुणबी जातप्रमाणपत्रे दिली गेल्याचा आरोपही भुजबळ यांनी केला.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles