ख्यमंत्री-दोन उपमुख्यमंत्री, मंत्री गिरीश महाजन आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा गाडीतील दाटीवाटीत बसलेला व्हिडीओ समाज माध्यमांत मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. या व्हिडीओवर विरोधकांकडून बरीच टीका झाली. याच व्हायरल व्हिडीओवर प्रतिक्रिया देताना उपमुख्यमंत्री अजित पवार चांगलेच खवळले. व्हिडीओ व्हायरल करणारा मूर्ख आहे, अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला.जे व्हिडीओ व्हायरल करतायेत, त्यांची मला कीव करावीशी वाटते. विकासाचं बोलुयात ना आपण… गाडीत किती बसले, कोण बसले… अरे दाटीवाटीचा त्रास जे गाडीत बसले त्यांना होईल ना… तुम्हाला त्रास व्हायचं काय कारण आहे? असा प्रश्न अजित पवार यांनी संतापून विरोधकांना विचारला. नको त्या विषयांवर बोलण्यात अर्थ नाही. त्यामुळे अधिक स्पष्टीकरण देण्याची गरज वाटत नाही. विरोधकांनी उगीच कोणताही विषय मोठा करू नये, असा सल्लाही त्यांनी दिला.