Wednesday, April 24, 2024

राष्ट्रवादीचे स्टार प्रचार एकनाथ खडसे घरवापसीच्या तयारीत…दिल्लीत हालचालींना वेग

तीस वर्षांहून अधिक काळ भाजपात राहून शरद पवारांच्या राष्ट्रवादीत गेलेले एकनाथ खडसे आता पुन्हा भाजपात परतणार असल्याचे वृत्त टाईम्स ऑफ इंडियाने दिले आहे.भारतीय जनता पक्षाशी ३० हून अधिक वर्षे एकनिष्ठ राहिल्यानंतर एकनाथ खडसे यांनी २३ ऑक्टोबर २०२० रोजी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. पक्षांतर्गत वाद, भोसरी भूखंड घोटाळा, देवेंद्र फडणवीसांशी मतभेद आदी विविध मुद्द्यांवरून त्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली होती. २०२० मध्ये राष्ट्रवादीत आल्यानंतर त्यांना तत्काळ नेतेपदी विराजमान करण्यात आलं.

रावेर लोकसभा मतदारसंघातून भाजपाकडून रक्षा खडसे यांना उमेदवारी दिली आहे. तर, महाविकास आघाडीत रावेरची जागा शरद पवार गटाला मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे या जागेवरून कोणाला उमेदवारी मिळणार याकडे सर्वांचं लक्ष होतं. एकनाथ खडसेंनाच या जागेवरून उमेदवारी मिळाल्यास सून-सासरे असा जंगी सामना रंगण्याची शक्यता होती. परंतु, या जागेवरून तीन ते चार उमेदवार इच्छुक असल्याचं एकनाथ खडसेंनीच स्पष्ट केलं होतं. दरम्यान, या काळात एकनाथ खडसे पुन्हा एकदा भाजपात सामील होण्याच्या चर्चांना जोर धरला. याच काळात त्यांनी दिल्लीवारी केल्याने या चर्चांना बळ मिळालं.

टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, एकनाथ खडसे भाजपात जाणार असल्याचं निश्चित झालं आहे. एकनाथ खडसे यांनी रावेर लोकसभा मतदारसंघातून सूनेविरोधात लढण्यास नकार दिल्यानंतर ते पुन्हा भाजपात परतणार असल्याचं स्पष्ट झालं आहे, असं या वृत्तात म्हटलं आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles