Thursday, July 25, 2024

येवलावाल्याला नाही पालथं केलं तर नाव सांगणार नाही…जरांगे पाटलांचा भुजबळांवर निशाणा

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा एल्गार पुकारला आहे. सध्या उपोषण स्थगित केलं असलं तरीही १३ जुलैपर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे.

त्यांनी पुन्हा एकदा ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्यावर निशाणा साधला आहे. टीव्ही ९ मराठीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

एक दोन जिल्ह्यांत बोगस नोंदी झाल्या आहेत. उत्तर महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीवेळी हा प्रश्न समोर आला, असा आरोप केला जातोय. त्यावर मनोज जरांगे म्हणाले, “संविधानाच्या पदावर बसूनही छगन भुजबळांना कळत नाही. स्वतःच्या स्वार्थासाठी सर्वांना वेड्यात काढलं. मी हैदराबाद गॅझेट आणलंय. १८८४ ची जनगणना आहे. रेकॉर्डेड ओरिजिनल प्रिंट आहे. यात सर्व मराठा समाज कुणबी आहे. भूमि अभिलेख ३७ क्रमांकावर आहे. हे बोगस आहे का? तुम्हाला दिलेलं आरक्षणच सुरक्षित नाही.”

ओबीसी आणि धनगरांना सांगणं आहे की यांच्या (छगन भुजबळांच्या) नादाला लागू नका. राजकीय उदय होण्याची क्षमता आहे. हे बाद झालेले केस आहेत. तुम्ही तुमचं करिअर यांच्या नादाला लागून खराब करून घेऊ नका. आम्ही ओबीसीत आलो तरीही तुमच्या आरक्षणाला धक्का लागत नाही. मग मराठ्यांची नाराजी का पत्करत आहात? एकसंघ राहा. तुमचं एसटीतील आरक्षण मिळेल. आतापर्यंत करोडो पोरांना आरक्षण मिळालं असतं. आमचं भांडण तुमच्याशी नाही, सरकारशी आहे. येवलावाल्या नाही पालथं केलं तर नाव सांगणार नाही. कितीही आडवे या, तरीही ओबीसीतच जाऊन दाखवणार”, असा सज्जड दमही त्यांनी भरला.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles