रासप नेते महादेव जानकर यांनी पक्ष बांधणीचा मोर्चा काढत अमरावती दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी रासपचे १४५ आमदार निवडून आले तर मी भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांना मुख्यमंत्री करेल, असं मोठं भाष्य केलं. महादेव जानकर असेही म्हणाले की, गोपीनाथराव मुंडे यांनी मला मुलगा मानलं, त्या नात्याने पंकजा मुंडे माझी बहीण झाली. आमच्या पक्षाचे जर १४५ आमदार निवडून आले तर मी माझ्या बहिणीलाच मुख्यमंत्री करेल, अशी घोषणाच महादेव जानकर यांनी केली.