Saturday, March 2, 2024

शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल, ज्येष्ठ विधीज्ञ उज्वल निकम म्हणाले…

शिवसेना आमदार अपात्रप्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर गेले काही दिवस सुनावणी सुरू होती. या सुनावणीचा निकाल १० जानेवारी रोजी लागण्याची शक्यता आहे. यावर ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांनी प्रतिक्रिया दिली आहे. उज्ज्वल निकम म्हणाले, दहाव्या परिशिष्टानुसार आमदारांची पात्रता किंवा अपात्रता याबाबत निकाल देण्याचा अधिकार विधानसभा अध्यक्षांना आहे. महाराष्ट्रात ज्या काही आमदारांना नोटीस बजावण्यात आली आहे, यात शिंदे गट आणि ठाकरे गट यांनी परस्परांविरोधात अपात्रतेची नोटीस दिली होती. याबाबत एकत्रित सुनावणी विधानसभेच्या अध्यक्षांसमोर झाली. याचा निकाल येत्या दोन दिवसांत अपेक्षित आहे.

१६ आमदारांना अपात्रतेची नोटीस दिली होती, ती दहाव्या परिशिष्टानुसार वैध किंवा अवैध आहे, यासंदर्भात विधानसभेचे अध्यक्ष भाष्य करू शकतात. त्यासंदर्भातील निर्णय अगोदर लागण्याची शक्यता आहे. ज्या नोटीशीद्वरे १६ आमदारांना अपात्रतेची नोटीस दिली होती, त्या नोटीशीतील मजकूर १० व्या परिशिष्ठानुसार ग्राह्य धरता येतो का हे अगोदर तपासलं जाईल. त्यानंतर त्यावर निर्णय घेतला जाईल”, असंही उज्ज्व निकम म्हणाले.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles