Tuesday, February 27, 2024

राज्य सरकारमध्ये धुसफूस… शिंदे गटाचे आमदार म्हणतात, छगन भुजबळांची मंत्रिपदावरून हकालपट्टी करा

मराठा आरक्षणाचा अध्यादेश काढल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवी मुंबईतील मराठा मोर्चाला संबोधित करताना मराठा आरक्षणासाठी राज्य सरकार कटिबद्ध असल्याचे सांगितले. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मराठा आरक्षणासाठी झटत असल्याचे दिसले. तर दुसरीकडे अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ हे सातत्याने मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्यासाठी विरोध करत असल्यामुळे ते मराठा समाजाच्या निशाण्यावर आहेत. आता खुद्द सरकारमधील घटकपक्ष असलेल्या शिंदे गटाकडूनही छगन भुजबळ यांना आव्हान देण्यात येत आहे. मराठा आरक्षणाच्या अध्यादेशावरून छगन भुजबळ मंत्रिपदाचा राजीनामा देऊ शकतात, अशी चर्चा होत असताना शिंदे गटाच्या नेत्यांनी भुजबळ यांची हकालपट्टी करावी, अशी मागणी केली आहे.

आमदार संजय गायकवाड यांनी माध्यमांशी बोलत असताना छगन भुजबळ यांच्यावर आरोप केले आहेत. “छगन भुजबळ हे मराठा समाजाच्याविरोधात तिरस्काराची भावना ठेवून बोलत आहेत. हे योग्य नाही, अशा मंत्र्याला मंत्रिमंडळात ठेवता कामा नये, त्यांची हकालपट्टी करावी. मंत्रिपद घेताना सर्वांना समान न्याय देण्याची शपथ घेतली जाते, अशावेळी भुजबळ एका समाजाचा तिरस्कार कसा काय करू शकतात?”, असा प्रश्न संजय गायकवाड यांनी उपस्थित करत टीका केली.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles