Monday, July 22, 2024

57 लाख कुणबी नोंदी रद्द करा, २८८ जागा लढवणार… ओबीसी नेत्यांच्या बैठकीत ठराव….

नागपूरमध्ये रविवारी ओबीसी संघटनांची विदर्भस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्याप्रमाणेच 288 जागांवर ओबीसी उमेदवार उभे करण्याचा इशारा या बैठकीतून सरकारला देण्यात आला. त्यामुळे आता राज्य सरकार ओबीसी नेत्यांची समजूत घालण्याच्यादृष्टीने कोणती पावले उचलणार, हे पाहावे लागेल.

प्रकाश शेंडगे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी म्हटले की, आजच्या बैठकीत विधानसभा निवडणुकीत 288 जागा लढवण्याचा ठराव मंजूर झाला. तसेच मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सगेसोयरेंचा शासन आदेश GR काढल्यास राज्यातील ओबीसी समाज रस्त्यावर उतरेल, असा इशारा प्रकाश शेंडगे यांनी दिला.

याशिवाय, बैठकीत ओबीसी समाजाच्या भविष्यातील वाटचालीबाबत चर्चा झाली. ओबीसी आरक्षणाचे रक्षण करण्याच्यादृष्टीने या बैठकीत काही ठराव मंजूर झाले. याशिवाय, राज्य सरकारने अलीकडच्या काळात केलेल्या 57 लाख कुणबी नोंदी या बोगस आहेत, त्या तातडीने रद्द कराव्यात, अशी ओबीसी समाजाची मागणी असल्याचे प्रकाश शेंडगे यांनी सांगितले.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles