Sunday, December 8, 2024

कांदा उत्पादकांसाठी मोठ्या प्रकल्पाची घोषणा, कृषी मंत्री धनंजय मुंडे यांचे आदेश

निसर्गाचा लहरीपणा आणि दरातील चढउतार यापासून कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी स्मार्ट प्रकल्पांतर्गत कांद्याची भुकटी करण्याचा प्रकल्प शेतकरी उत्पादक कंपनीमार्फत राबविण्यात येणार असल्याची माहिती कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली.

माजी विधान परिषद सदस्य जयंत जाधव (Jayant Jadhav) यांनी कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे बैठकीची मागणी केली होती. त्या अनुषंगाने झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

शेतकऱ्यांना चांगला फायदा मिळू शकतो

निसर्गाच्या लहरीपणामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान होते. तसेच कांदा निर्यातीबाबतच्या धोरणात फेरबदल केल्यानंतर कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागते. काही वेळा शेतकरी कांदा फेकून देतात. त्यामुळे नाशिक जिल्ह्यात शेतकरी उत्पादक कंपनीकडून डीहायड्रेशन प्रोजेक्ट केल्यास कांद्याची भुकटी करून शेतकऱ्यांना चांगला फायदा मिळू शकतो. त्यामुळे अशा प्रकारचा पथदर्शी प्रकल्प राबवून कांदा उत्पादकांना दिलासा देण्याची मागणी जाधव यांनी शासनाकडे केली होती.

हा प्रकल्प नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा व्यापक जनहिताचा असल्यामुळे या प्रकल्पाला स्मार्ट योजनेतून 60 टक्के ऐवजी 90 टक्क्यांपर्यंत अनुदान देण्यासाठी जागतिक बँकेकडे स्वतंत्र प्रस्ताव सादर करण्याचे आदेश यावेळी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिले.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles