Tuesday, April 23, 2024

महायुतीचा ४५ प्लसचा नारा फुसका ठरणार?… ओपिनियन पोलमध्ये ‘मविआ’ला सुगीचे दिवस…

एबीपी आणि सी व्होटर्सचा सर्व्हे आला आहे. ज्यानुसार महाराष्ट्रात महाविकास आघाडीची जादू चालणार असं चित्र आहे. एबीपी आणि सी व्होटर्स सर्व्हेनुसार २८ जागांवर महायुती तर २० जागांवर महाविकास आघाडीचा विजय होईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. भाजपाने महाराष्ट्रात मिशन ४५+ चा नारा दिला आहे. अशात हा धक्कादायक अंदाज या पोलमधून समोर आला आहे.

ओपनियन पोलनुसार, महायुतीमध्ये असणाऱ्या भाजपला २२ जागांवर विजय मिळेल असा अंदाज आहे. तर शिंदे गट आणि अजितदादा गटाला मिळून फक्त सहा जागा जिंकता येतील. म्हणजेच महायुतीच्या खासदारांची संख्या ही २८ असेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. याउलट महाविकास आघाडीत काँग्रेसचे चार खासदार विजयी होतील. तर ठाकरे गट आणि शरद पवार गटाचे मिळून एकूण १६ खासदार विजयी होतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या अंदाजानुसार महाविकास आघाडीचे २० खासदार निवडून येतील.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles