कोल्हापूर जिल्ह्यातल्या अनेक मतदारसंघांमधील नाराज तसेच इच्छुक असे अनेक उमेदवार शरद पवार यांची भेट घेणार आहे. त्याचबरोबर भाजपचे बडे नेते समरजित घाटगे देखील आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह शरद पवार यांच्या पक्षात जाहीर प्रवेश करणार आहेत. त्यांच्या पक्षप्रवेशामुळे जिल्ह्यात राष्ट्रवादीची ताकद वाढणार आहे.
शरद पवार यांच्या दौऱ्याआधी सोलापुरातील कालग विधानसभा मतदारसंघात बॅनरबाजी करण्यात आली आहे. वस्ताद येत आहेत, असं म्हणत समरजित घाटगे भावी आमदार असा उल्लेखही या बॅनर्सवरती करण्यात आला आहे. त्यामुळे कागलमध्ये चर्चांना उधाण आलं आहे.
दरम्यान, शरद पवार हे कागलमधील गैबी चौकात आज जाहीर सभा घेणार आहेत. विशेष बाब म्हणजे याच गैबी चौकात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचं घर आहे. त्यामुळे आजच्या सभेत शरद पवार नेमकं काय बोलणार? याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून आहे.