अजित पवारांनी सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आमच्या आमदारांना मंत्रिपदापासून दूर रहावं लागलं. त्यावेळी शिंदे गटाच्या आमदारांनी जाहीर नाराजी व्यक्त केली होती. अजित पवार थोडे दिवस नसते आले तरीही चाललं असतं. असं रामदास कदम फडणवीसांना उद्देशून म्हणाले. तसंच एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री केल्याबद्दल त्यांनी आभारही मानले. मात्र अजित पवार महायुतीत आल्याने महायुतीतली नाराजी त्यांनी अशा पद्धतीने बोलून दाखवली आहे. आता यावर देवेंद्र फडणवीस काही उत्तर देणार का? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. तसंच दस्तुरखुद्द अजित पवार यावर काय बोलणार? हे पाहणंही महत्त्वाचं असेल.
दरम्यान रामदास कदम यांच्या विधानावर राष्ट्रवादी अजित पवार गटाने प्रत्युत्तर दिले आहे. आ.अमोल मिटिकरी यांनी म्हटले आहे,
रामदास कदमजी आपण जोरात बोललात
“मागुन आलेले अजित दादा थोडे उशिरा आले असते तर बरं झालं असतं”
माहितीसाठी सांगतो ते वेळेत आले म्हणून तुमची लंगोट तरी वाचली उशिरा आले असते तर हिमालयात जप करायला जावं लागलं असतं
दादांची कृपा म्हणून तुम्ही वाचलात हे विसरू नका..