Thursday, January 23, 2025

शिंदेंना ‘गृह’ आणि अजितदादांना ‘अर्थ’ खातं नाही… भाजपचा आक्रमक पवित्रा……

मागच्या महायुती सरकारमध्ये मुख्यमंत्री असणाऱ्या एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्री व्हावं लागल्याने शिवसेनेने वारंवार गृहमंत्रिपद आपल्याकडे असावं, असा दावा केला. मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हे खातं देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर अजित पवारांना अर्थखातं सांभाळण्याचा दांडगा अनुभव आहे. शिंदे सरकारमध्येदेखील अजित पवार अर्थमंत्री होते. मात्र आता अर्थखातं भाजपकडेच राहणार असल्याची माहिती आहे. टिव्ही ९ ने सदर वृत्त दिले आहे.

एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास आणि महसूल खातं असणार आहे. तर अजित पवार यांच्याकडे गृहनिर्माण, सार्वजनिक बांधकाम ही महत्त्वाची खाती असणार आहेत. तर यंदा देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात अनुभवी मंत्र्यांचा समावेश असेल. तर काही नव्या चेहऱ्यांनाही संधी देण्यात येणार आहे. शिवसेनेच्या दीपक केसरकर, अब्दुल सत्तार आणि तानाजी सावंत यांचा पत्ता कट होणार असल्याची माहिती आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles