Sunday, July 21, 2024

माझ्या मनाला दुःख झालं. मला ते अपमानास्पद वाटलं… छगन भुजबळांची खदखद

नाशिकमधून उमेदवारी मिळाली नाही म्हणून भुजबळ यांनी पुन्हा एकदा त्यांची नाराजी व्यक्त केली आहे. छगन भुजबळ यांनी शुक्रवारी टीव्ही ९ मराठीला दिलेल्या मुलाखतीत त्यांची परखड भूमिका मांडली. छगन भुजबळ म्हणाले, लोकसभा निवडणुकीच्या उमेदवाऱ्या जाहीर होऊ लागल्या होत्या, सगळ्या जगाची नावं जाहीर झाली तरी महायुतीत चर्चा चालू होती. माझ्या मनाला दुःख झालं. मला ते अपमानास्पद वाटलं, इंग्रजीमध्ये ह्युमिलिएशन (अपमान) शब्द आहे, तशीच स्थिती होती. असं वाटणं स्वाभाविक आहे. यावर भुजबळ यांना विचारण्यात आलं की, तुमचा अपमान कोणी केला? यावर भुजबळ म्हणाले, ज्यांनी केला तो केला… त्यांच्या काही अडचणी असतील… किंवा तसं काही असू शकतं. परंतु, कोणी बोलून दाखवलेलं नाही. कोणी म्हटलं नाही की भुजबळांना उभं केलं तर अमुक होईल, तमुक होईल. छगन भुजबळ हे अजित पवार गटाचे उमेदवार नसणार, ते महायुतीचे उमेदवार असणार आहेत. ते युतीचे उमेदवार असतील तर मराठा समाजाची मतं इतरत्र जातील किंवा युतीविरोधात जातील, असा काहीतरी प्रचार कोणीतरी केला असेल, किंवा कोणीतरी समज करून घेतला असेल. मला याबाबत अधिकृत माहिती नाही. परंतु, मी जे काही ऐकतोय त्यावरून मला असं वाटतंय

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles