Wednesday, April 17, 2024

आमदार रोहित पवार पक्षात नाराज? ‘त्या’ व्टिटमुळे चर्चांना उधाण

लोकसभा निवडणूक आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. मात्र पुन्हा एकदा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातील अंतर्गत धुसफूस उघड झाली आहे. आमदार रोहित पवार नाराज असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
निलेश लंकेंच्या पक्ष प्रवेशाचं श्रेय हे खासदार अमोल कोल्हे आणि आमदार प्राजक्त तनपूरे यांना दिल्याने आमदार रोहित पवार नाराज असल्याची चर्चा आहे. शरद पवारांच्या उपस्थिती लंकेना जयंत पाटीलांनी पक्षाचं चिन्ह दिलं, त्यावेळी रोहित पवार अनुपस्थित होते. त्यामुळे पुन्हा एकदा अंतर्गत नाराजीची चर्चा सुरू झाली आहे. त्यातच रोहित पवारांनी एक ट्विट केलं आहे, ज्यामध्ये त्यांनी दुसऱ्या फळीतील नेते असा टोमणा मारला आहे. ‘नेता एकटा लढतोय. विरोधाची म्हणावी तशी धार नाही’ असं ट्विट रोहित पवार यांनी केलं आहे. या ट्विटवरून पुन्हा एकदा चर्चेला उधाण आलं आहे.

#जन_की_बात ऐकली तर #चायना_गॅरंटी देणाऱ्या भाजपबाबत लोकांमध्ये संतापाची तीव्र लाट असल्याचं दिसतं. पण हा संताप दिसूनही विरोधक म्हणून आम्ही पाहिजे तितकं आक्रमक का होत नाही? एकेकट्या लढणाऱ्या प्रमुख नेत्यांना ‘दुसऱ्या’ फळीतील नेत्यांनीही खंबीर साथ देऊन विरोधाची धार अधिक तीक्ष्ण करण्याची गरज आहे.

काही ठराविक नेते आणि कार्यकर्ते हेच #महाशक्तीला अंगावर घेत जातील पण
काही नेते मात्र व्यक्तिगत ॲडजस्टमेंट करतील किंवा द्विधा मनस्थितीत असतील तर #महाराष्ट्र_धर्माचं आणि सामान्य माणसाचं मोठं नुकसान होईल, हे सर्वांनीच लक्षात घ्यायला हवं..

एकजुटीने लढू अन् भाजपला सत्तेबाहेर काढू!!

https://x.com/RRPSpeaks/status/1768610144445931873?s=20

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles