मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली. या टीकेनंतर भाजप आमदार आक्रमक झाले. मनोज जरांगे यांची वक्तव्ये आणि हिंसक आंदोलनाची एसआयटी चौकशी करा, अशी मागणी भाजप आमदारांकडून विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात करण्यात आली.
या मागणीनंतर विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मनोज जरांगेंच्या आंदोलनाची एसआयटी चौकशी करण्याचे निर्देश दिले. दरम्यान, यावरून काँग्रेस नेते नाना पटोले यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार निशाणा साधत खळबळजनक आरोप केला आहे. मनोज जरांगे फक्त निमित्त असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच भाजपचे टार्गेट असल्याचं पटोले यांनी म्हटलं आहे.
भाजपचे खरे टार्गेट मुख्यमंत्री शिंदेच, मनोज जरांगे फक्त निमित्त
- Advertisement -