राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष आणि माजी मंत्री महादेव जानकर यांनी नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीतील भाजप महायुतीच्या विजयावर भाष्य केले आहे. महादेव जानकर पुढे असेही म्हणाले, ईव्हीएम हॅक करता येऊ शकतं, असं मोठं विधान महादेव जानकर यांनी केलं आहे. अनेक ठिकाणी ईव्हीएममध्ये घोटाळा झाल्यामुळं महायुतीच्या जागा निवडून आल्या आहेत. ईव्हीएमवर माझा आक्षेप आहे. देशभरात आम्ही याविरोधात आंदोलन करू. ईव्हीएममुळे देशाची लोकशाही धोक्यात आली आहे. ईव्हीएम हॅक करता येतं. मी स्वतः इंजिनिअर आहे. त्यामुळं मला सगळं माहीत आहे. सुप्रीम कोर्ट, निवडणूक आयोग सगळे त्यांचे आहेत. त्यामुळं याला लोकशाही म्हणता येणार नाही. लोकशाहीचा खून करण्याचं काम झालं आहे, असं महादेव जानकर म्हणालेत.
‘ईव्हीएम’मुळे देशाची लोकशाही धोक्यात… रासपचे अध्यक्ष महादेव जानकर कडाडले….
- Advertisement -