राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी महायुतीला १६ ते १७ जागा मिळतील असा दावा केेला आहे.
महायुतीकडून मोठ्या प्रमाणात पैसे आणि गुंडागर्दीचा वापर सुरू आहे. मात्र पक्ष आणि कुटुंब फोडल्यामुळे भाजपाचाच मतदार पक्षावर नाराज आहे. देवेंद्र फडणवीस आणि इतर नेत्यांनी राजकीय पातळी खाली आणली त्यामुळे सामान्य नागरिक नाराज आहे. भाजपाचे मतदार बाहेर निघत नाहीयेत, असा टोला रोहित पवार यांनी लगावला.
तसेच भाजपाचा मतदार बाहेर न आल्याने याचा फायदा महाविकास आघाडीला फायदा होईल, असे म्हणत भाजपला १३ ते १४, शिंदे गटाला २ ते ३ जागा आणि अजित पवार गटाला एकही जागा मिळणार नाही तसेच एकूण महायुतीला १६ ते १७ जागा मिळतील, असा दावा रोहित पवार यांनी केला आहे.