महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत भाजपला 132 जागा मिळाल्याने देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होणार असं पक्षश्रेष्ठींकडून निश्चित झालेलं असताना आता शपथविधीबाबत चर्चा सुरू आहे. अशात आता मुख्यमंत्रीपदासाठी अचानक केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या नावाची चर्चा देखील सोशल मीडियावर सुरू असल्याचं दिसतंय. खासदारकीवरून थेट मुख्यमंत्री अशी पुन्हा लॉटरी लागणार अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांकडून येऊ लागल्या होत्या. अशात मुरलीधर मोहोळांनी मात्र या बातमीचं खंडन करत सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केलीय.
मुरलीधर मोहोळांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केलीय, ज्यात त्यांनी म्हटलंय, “समाजमाध्यमांमधून माझ्या नावाची महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदासाठी होणारी चर्चा निर्थरक आणि कपोलकल्पित आहे.आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून लढताना महाराष्ट्र विधानसभा निवडणूक आमचे नेते मा. देवेंद्रजींच्या नेतृत्वात लढलो. महाराष्ट्राच्या जनतेने कौलही ऐतिहासिक दिला आहे.आमच्या भारतीय जनता पार्टीत पक्षशिस्त आणि पार्टीचा निर्णय सर्वोच्च असतो. असे निर्णय पार्लिमेंटरी बोर्डात एकमतावर घेतले जातात, ना की सोशल मीडियाच्या चर्चेवर ! आणि पार्लिमेंट्री बोर्डात एकदा का निर्णय झाला, तर पार्टीचा निर्णय आमच्यासाठी सर्वोच्च असतो. म्हणूनच माझ्या नावाची सोशल मीडियात होणारी चर्चा अर्थहीन आहे.”
भाजपचे धक्कातंत्र? फडणवीस नाही तर प्रथमच निवडुन आलेले ‘हे’ खासदार होणार मुख्यमंत्री….
- Advertisement -