शिवसेना कुणाची यावर निर्णय देताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी निवडणूक आयोगाचा निकाल कायम ठेवत शिंदेंचा दावा मान्य केला. शिवसेनेत फूट पडताना बहुमत हे शिंदेंकडे असल्याचं सांगत राहुल नार्वेकरांनी शिवसेना ही शिंदेंचीच असल्याचं सांगितलं आहे. या निकालामुळे राष्ट्रवादीचा अजित पवार गट मात्र निश्चिंत झाल्याचं चित्र असून शरद पवार गटाची धाकधूक वाढली आहे. जो न्याय शिदेंना मिळाला तोच न्याय अजित पवारांना मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
शिवसेनेच्या आमदारांच्या अपात्रतेवर निकाल आला असून विधानसभा अध्यक्षांनी दोन्ही गटाच्या याचिका फेटाळून लावल्या आणि कुणालाही अपात्र केलं नाही. पण त्याचवेळी बहुमताच्या आधारे त्यांनी शिंदेंचा शिवसेनेवरील दावा मान्य केला आणि उद्धव ठाकरेंना मोठा धक्का दिला. आता यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बाबतीत सुनावणी होणार आहे.