राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे सर्व नेते पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवारांच्या भेटीसाठी वाय. बी. सेंटर येथे पोहचले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बंड केल्यानंतर सर्व मंत्र्यांसह पहिल्यांदाच शरद पवारांच्या भेटीला गेले आहेत. दरम्यान आज अचानक अजित पवार गटाचे सर्व मंत्री व नेते शरद पवारांच्या भेटीला पोहचल्याने राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा उधाण आले आहे.
अजित पवार गटातील नेत्यांची शरद पवार यांना घातलेले साकडे यावर शरद पवारांनी काहीच प्रतिक्रिया दिलेली नाही. यामुळे अजित पवार गटाचे हे सर्व प्रयत्न निष्फळ ठरल्याचे दिसून येत आहे. अजित पवार यांच्या गटातील नेत्यांची भेटीची औपचारिकता संपल्यानंतर शरद पवार राष्ट्रवादीच्या कार्यालयात गेले आहेत.