“प्रफुल्ल पटेल साहेबांनी भविष्य वर्तवलेलं घड्याळ आम्हालाच मिळणार, तेव्हा आम्ही इलेक्शन कमिशनकडे तक्रार केलेली. निवडणूक आयोगाने दोघांच्या वकिलांसमोर सांगितलेलं की, आमच्याबद्दल म्हणजे निवडणूक आयोगाबद्दल कोणी भविष्य वर्तवू नका. आम्ही कधीच बोलत नाही की, पक्ष-चिन्ह आम्हालाच मिळणार. निवडणूक आयोग एक स्वायत्त संस्था आहे. त्यांना त्यांचे अधिकार आहेत. त्यांच्या निर्णयाबद्दल बोलण चुकीचच आहे” असं जितेंद्र आव्हाड म्हणाले. अजितदादा गट आणि शिंदे गटात जागावाटपावरुन वाद होण्याची शक्यता आहे, या प्रश्नावर जितेंद्र आव्हाड म्हणाले की, “दुसऱ्याच्या घरात डोकावायच नसतं. त्यांच्या घरात काय चाललय? भांडण चालू आहे का? आम्हाला काय करायचय? आम्ही आमचा संसार बघू. भाजपा दोघांना घरचा रस्ता दाखवणार. शिंदे आणि अजितदादा गट दोघांना कमळाच्या चिन्हावर निडवणूक लढवावी लागणार” दादानी सांगितलय की, घड्याळाच्या चिन्हावर निवडणूक लढवू त्यावर वक्त आने पर सब सामने आयोगा असं उत्तर आव्हाडांनी दिलं.