Wednesday, May 22, 2024

धनंजय मुंडेंना कशाकशातून बाहेर काढलं हे सांगितल तर त्यांना महाराष्ट्रात फिरणे अवघड होईल, शरद पवारांचा संताप…

धनंजय मुंडेंच्या पहाटेचा शपथ विधी आणि सुनेला परकं म्हटल्याच्या टीकेवरून शरद पवार यांना माध्यमांनी प्रश्न विचारला असता पवार संतापल्याचं पाहायला मिळालं. यावेळी ते म्हणाले की, मुंडेंच्या कोणत्याही टीकेला मी उत्तर देणार नाही. त्यांची तेवढी लायकी नाही. तसेच मी जर त्यांच्या उद्योगांवर बोललो तर त्यांचं महाराष्ट्रात फिरण अवघड होईल.

पवार म्हणाले की, मुंडेंच्या कोणत्याही टीकेला मी उत्तर देणार नाही. ज्यांचं नाव तुम्ही घेत आहात त्यांची तेवढी लायकी देखील नाही. त्यांना मी कशा कशातून बाहेर काढलं. याची यादी वाचली तर त्यांचं महाराष्ट्रात फिरण अवघड होईल. त्यामुळे त्यांनी केलेल्या उद्योगांवर मी आता बोलू इच्छित नाही. त्यांना लहान कुटुंब, लहान समाजातील उद्योन्मुख तरूण म्हणून संधी दिली. लोकांची त्यांच्यावर नाराजी होती. हे सगळं माहित असताना देखील ते आता माझ्यावर व्यक्तिगत हल्ले करत आहेत. कुटुंबावरून टीका करत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर यापुढे मी बोलणार नाही. आज त्यांचा शेवटचा उल्लेख मी करत आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles